विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा आणि पक्ष बांधणी मजबूत करा काँग्रेस – नेते मनोज शिंदे

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक व पक्ष बांधणी संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी श्री रमेश चन्निथला व व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांचे सूचनेनुसार काँग्रेस कार्यालय नेहरू भवन उल्हासनगर 2 या ठिकाणी उल्हासनगर काँग्रेस सहप्रभारी प्रभारी मनोज शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बोलताना मनोज शिंदे म्हणाले की देश अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूकी मध्ये अत्यंत कडवी झुंज देऊन काँग्रेस पक्षाला घवघवीत यश म्हणून दिले आहे.ही लढाई अजून संपलेली नाही तोपर्यंत काँग्रेस सत्तेत येत नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा अविरत लढायचा आहे आगामी विधानसभेमध्ये कोकणामध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळाव्यात म्हणून लवकरच महाराष्ट्राचे प्रभारी यांच्याकडे म्हणने मांडणार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,बूथ तथा वॉर्ड लेवल वर बांधणी करून अंबरनाथ विधानसभेमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केले की जे कार्यकर्ते उल्हासनगर विधानसभेसाठी इच्छुक असतील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरावा पदाधिकारी ने एक दिलाने कार्य करावे मी सदैव तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही दिली.
तसेच भाजप च्या ABVP संघटनेतून काँग्रेस मध्ये NSUI ह्या विद्यार्थी संघटनेत काम करण्यासाठी देव आठवले व त्यांच्या सहकार्यांनी मनोज शिंदे ह्यांच्या उपस्तीथतीत पक्ष प्रवेश केला. यावेळी किशोर धडके ,सुनील बेहरानी,नाणिक आहुजा, मनीषा महाकाळे ,फरियाद शेख ,रोहित ओव्हाळ नारायण गेमनानी ,आसाराम टाक ,राजेश मल्होत्रा ,दीपक सोनोने ,विशाल सोनवणे ,वामदेव भोयर ,अमर जोशी ,आबा साठे ,शैलेंद्र रुपेकर ,राकेश मिश्रा ,संतोष मिंडे ,निलेश जाधव ,अन्सार शेख ,उषा गिरी ,विद्या शर्मा ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.