Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

कल्याण पश्चिमेच्या योगीधाम येथील सिटी पार्क प्रकल्पाची जागा झाली जलमय.

कल्याण : नीतू विश्वकर्मा

अम्बरनाथ उल्हासनगर कल्याण हुन वाहत येणारी वालधुनी नदी आधीच इतके प्रकोप सोसत असताना  तिची छाती दडपून टाकणाऱ्या अजून एका प्रकल्पाची त्यात भर पडली आहे. कल्याण डोम्बिवली मनपा तर्फे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सिटी पार्क हा प्रकल्प उभारला गेला आहे. 23 एकर जागेत जवळपास 112 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. या प्रकल्पासाठी नदी च्या पात्रातच 1 किलोमीटर लांब व 20 फुट ऊंच 15 फुट रुन्द सिमेंट दगड ने भिंत बनवुन माती चा भराव टाकला गेला आहे. भराव टाकून पात्र बुजवून मग त्यावर हा प्रकल्प उभा झाला आहे. जवळपास 23 एकर जागे वर भराव टाकला गेला, वालधुनी नदी चे रक्षकच वालधुनी नदी चे मारेकरी कसे असु शकतात? असे स्थानिक रहिवासीयां सोबत वालधुनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधुनी नदी स्वच्छ्ता समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.


सदर ज़मीनी वर मालकी हक्का बाबत न्यायालयात वाद सुरु असताना सुद्धा कल्याण डोम्बिवली परिसरात वालधुनी नदी चे पात्र हे 90 मीटर रुन्द असले पाहिजे, परंतु नदी पात्रातच बांधकाम करुन, नदी ची दिशा वळवून स्वतःच दिलेल्या आदेशा चे उल्लंघन शासन प्रशासन करते आहे, त्याच बरोबर मा सर्वोच्च न्यायालय च्या आदेशा च सुद्धा उल्लंघन कडोंमपा प्रशासन करते आहे, कल्याण पश्चिम योगीधाम येथील गुरूआत्मन संकुला लगत स्मार्ट सीटी पार्क चे निमित्त घेऊन नदीपात्रात नियमांंचे उल्लंघन करून भराव टाकून, नैसर्गिक प्रवाह वळवून व नदी चे पात्र मध्ये च संरक्षण भिंत उभी करून पालिकेतर्फेच अतिक्रमण करण्यात आले आहे. ह्या परीसरातिल नागरिकांना अतिव्रुष्टि झाली तर महापूराचा तडाखा बसल्याशीवाय राहणार नाही.आज ही आणि आधी ही बसला आहे, कोटयवधि रूपयांचे नुकसान सुद्धा झाले आहे, अश्यातच हज़ारो रहिवासीयांचे जीवन मरणा चे सर्वस्वी जवाबदार कडोंमपा प्रशासन असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights