कल्याण मध्ये कष्टकरी फेरीवाल्यांचा महानगर पालिकेवर धडक मोर्चा.

कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण मध्ये गेली १५ दिवसांपासून महानगर पालिकेनी शिवाजी चौक ते दीपक हॉटेल या रस्त्यावरील फेरीवाल्यांना बंदी केली आहे. त्यामुळे कष्टकरी फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.माणूस स्वतः उपाशी राहू शकतो पण परिवाराला उपाशी ठेऊ शकत नाही त्यामुळे आज त्या फेरीवाल्यांनी रिपब्लिकन हॉकर्स युनियन यांच्या नेतृत्वात महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढला होता.
ह्या मोर्चामध्ये कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ कांचन योगेश कुलकर्णी ,राष्ट्रकल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी,काँग्रेस सेवादलचे प्रदेश पदाधिकारी मुन्ना श्रीवास्तव,सत्यभामा जयस्वाल,देवकी जाधव आधी पदाधिकारी आणि शेकडोच्या संख्येने फेरीवाले सहभागी होते.