पाण्यासाठी केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण पश्चिम विभागातील वडवली, अटाळी,अंबिवली,मोहने परिसरातील तीव्र पाणीटंचाईकडे महापालिकेकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत आज शिवसेना वडवली शाखा,उपशहरप्रमुख दुर्योधन पाटील यांच्या माध्यमातून हंडा मोर्चा आंदोलन क.डों.म.पा.अ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर काढण्यात आला.या आंदोलनात सहभागी झालो.यावेळी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना पाणी टंचाई बाबत जाब विचारले असता या भागातील पाणी टंचाईवर योग्य नियोजन करून दोन दिवसात मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी माजी नगरसेविका हर्षाली थविल-चौधरी, विभाग प्रमुख रमन तरे,उपविभाग प्रमुख रमेश पाटील,शाखा प्रमुख बाळाराम पाटील,युवासेना कल्याण उपशहरप्रमुख वैभव पाटील,विजय चौधरी,पंकज पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.