Ambernath breaking newsBreaking NewsheadlineHeadline Todaypolitics

अंबरनाथ- उल्हासनगर मधील पूर्ण होत असलेल्या कामांचे भूमिपूजन करून नागरिकांचे सेवेसाठी खुले होतील या पार्श्वभूमीवर आ.बालाजी किणीकर हे रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रालयांच्या दालनात दाखल.

अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा

अंबरनाथ तसेच उल्हासनगर ४ व ५ क्षेत्रात झपाट्याने विकास कामे सुरु असून कसे लवकरात लवकर ते नागरिकांचा सेवेसाठी खुले होतील तसेच मंजूर व पूर्णतः आलेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कसे करता येईल याबाबत आढावा बैठक सर्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा मंत्रालय येथिल दालनात व आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा उपस्थित पार पडली.

याबाठकीत अंबरनाथ आय.टी.आय. नवीन इमारतिचे भूमिपूजन, अंबरनाथ न्यायालयाचे लोकार्पण, शासकीय विश्राम गृहाचे लोकार्पण, उल्हासनगर-५ प्रशासकीय इमारत येथिल कामाचा आढावा, उल्हासनगर तालुका क्रीडा संकुल लोकार्पण,अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलां-मुलीं करिता निवासी शाळेच्या कामाचा आढावा,मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांबाबत चर्चा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सुरु असलेल्या सर्व कामाची स्थिती व सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी उपसचिव श्रीरंग साहेब, मुख्य अभियंता श्री. राजभूज साहेब, अधीक्षक अभियंता श्री. तांबे साहेब, कार्यकारी अभियंता,सा. बां. उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत मानकर साहेब,तसेच इतर अभियंता व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights