मुंबई तरुण भारत वृत्तपत्रातर्फे राष्ट्रप्रखर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन,भरघोस पारितोषिक जिंकण्याची संधी.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
मुंबई तरुण भारत या अग्रगण्य वृत्तपत्रातर्फे राष्ट्रप्रखर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून विजेत्यांना भरघोस पारितोषिक जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एक लाखांचे पहिले, 75 हजारांचे दुसरे, 25 हजारांचे तिसरे तर उत्तेजनार्थ म्हणून 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुरबाड, शहापूर ,पालघर, नवी मुंबई, रायगड, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या विभागातील वाचक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. त्यासाठी “हिंदू पतपातशाह छत्रपती शिवाजी महाराज”, “शिवयोगीनी अहिल्यादेवी होळकर”, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य” आणि “डॉ.हेडगेवार यांची राष्ट्रनिर्मितीची संकल्पना” या चार विषयांवर स्पर्धकांना आपापले व्हिडिओ बनवून पाठवायचे आहेत. प्रत्येक व्हिडिओसाठी २ मिनिटांची वेळ मर्यादा देण्यात आली असून सोबत दिलेल्या क्यू आर कोड वरती हे व्हिडिओ पाठवायचा आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून जिल्हा आणि विभागवार 40 स्पर्धक निवडले जाणार आहेत. त्या 40 स्पर्धकांची विभाग किंवा जिल्हानिहाय ऑफलाईन वक्तृत्व स्पर्धा होईल. यासाठी प्रत्येकी पाच मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. या 40 जणांतून पुढील 10 स्पर्धक निवडले जाणार आहेत. ज्यातून अंतिम फेरीसाठी तीन स्पर्धक पाठवले जातील. या स्पर्धेसाठी 22 ते 55 या वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वरील चार विषयांपैकी एका विषयावर स्वतःच्या मोबाईल मोबाईलवर तयार केलेला व्हिडिओ क्यू आर कोड स्कॅन करून पाठवायचा आहे. डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालय येथे उप – उपांत्य अणि उपांत्य फेरी पार पडेल. लोकल न्यूज नेटवर्क या स्पर्धसाठी सहयोगी संस्था आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 9136536433