वाढदिवसाच्या कोणत्याही शुभेच्छा न देण्याचे मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांच्याकडून आवाहन.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
1 ऑगस्ट 2024 दर वर्षी 1 ऑगस्ट रोजी अँड. प्रदीप गोडसे हे त्यांचा वाढदिवस त्यांच्या आईच्या हाताची मिसळ मेजवाणीचा कार्यक्रम करून साजरा करीत असतात.
परंतु यावर्षी त्यांचे विभाग अध्यक्ष, लहान भाऊ समान मानणारे श्री.नितेश चव्हाण यांच्या बहिणीचे मिस्टर म्हणजेच भाऊजी यांचे आताच पुण्यात पूर आल्याने ते पुराच्यापाण्यात वाहून गेले व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही खूप मोठी दुःखद घटना नितेश चव्हाण यांच्या कुटुंबावर कोसळली आहे.
अश्या परिस्थितीत अँड. श्री प्रदिप गोडसे यांनी आपला वाढदिवस न साजरा करण्याचे ठरविले आहे. तरी वाढदिवसानिमित्त कोणीही भेटण्यास येऊ नये, फोनही करू नये व कोणाच्याही शुभेच्छांना प्रतिसाद मला देता येणार नाही असे म्हणत त्यासाठी अँड. प्रदिप गोडसे यांनी सर्वांची क्षमा मागत वाढदिवस न साजरा करण्याचे ठरवले आहे.