Breaking NewscelebratingCelebration dayfestivalheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewspoliticsreligionThaneUlhasnagarUlhasnagar Breaking News

पंढरपूर वारी : खा. डॉ.श्रीकांत शिंदे वारकरी बांधवांसह विठूनामाच्या जयघोषात दंग.

फलटण : नीतू विश्वकर्मा

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत वारकरी बांधवांसमवेत विठ्ठल नामाचा जयघोष केला.

राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यातील संत तुकोबा माऊलींची, संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असतात. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग होत असतात. गेल्या वर्षी प्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपायोजना राबविल्या आहेत. विशेष दिंड्यांना आर्थिक साहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचे मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केले.

या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights