उल्हासनगरातील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या फी वाढी विरोधात ठिय्या आंदोलन.


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
न्यू इंग्लिश हायस्कूलचा मनमानी कारभार इयत्ता 1ली ते 4थी प्राथमिक विभाग विनाअनुदानित आहे व 5 वी ते 10 वी माध्यमिक पूर्णतः अनुदानित आहे तरीदेखील माध्यमिक 5 वी ते 10 वी वर्गाची मागील 10 वर्षांपासून सुरवातीला 2500 रूपये फी होती काही वर्षातच तीच फी 4500 रूपये वर आणली आणि मागील 2 वर्षांपासून 15000 रूपये वर आणून ठेवली आहे. तसेच प्राथमिक 1 ली ते 4 थी विना अनुदानित वर्गाची शालेय फी शिक्षक-पालक मिटिंग मान्यते शिवाय नियमबाह्य पद्धतीने वाढवून 20 हजार रु. इतकी केली आहे त्याविरोधात विद्यार्थी पालक यांचा धडक मोर्चा ठिय्या आंदोलन शिक्षण अधिकारी ठाणे जिल्हा यांच्या दालना समोर करण्यात आले.
या वेळी उपस्थित माजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नरेश गायकवाड,मानव जनजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे,रोहीत दादा विचार मंचाचे उल्हासनगर शहर अध्यक्ष रणजीत गायकवाड, कल्याण -डोंबिवली मानवहीत लोकशाही पक्षाचे अध्यक्ष प्रकाश खंडागळे, बोरकर मॅडम,कृष्णा जगन साठे,संजय माळी,
विष्णू सरकार, मधुकर पाटील, नीतू गझने,सरिता यादव, मनीमला पिल्ले,सरस्वती मॅडम, मिनु गुप्ता, स्वाती भोईर, राणी खाजेकर ,वंदना सरकार यांच्या सह 70 ते 80 विद्यार्थी पालक. आंदोलनामध्ये सहभागी होते