शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कल्याण पूर्व ते पश्चिम जाण्यासाठी केडीएमटीच्या बस सेवा सुरू करण्याची कल्याण पूर्व शिवसेना शहर तर्फे मागणी.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
प्रायव्हेट गाड्यांचे भाडे गरीब, मध्यमवर्गीय आणि सामान्य विद्यार्थ्याला परवडणारे नाही याचा विचार करून कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी आज केडीएमटी महाव्यवस्थापक त्यांच्या कार्यालयात धडक देवून विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्टेशन ते चक्की नाका-सुचक नाका तसेच कल्याण पश्चिममधील मुथा कॉलेज, बिर्ला कॉलेज, सोनावणे कॉलेज परिसरात केडीएमटीने रूट बनवून तात्काळ बस सेवा सुरू करावी अशी मागणी कल्याण पूर्व शिवसेना शहरच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक राजाराम उर्फ आप्पा पावशे, सुशीला माळी, दाखिनकर , शाखाप्रमुख प्रशांत बोटे, मयूर म्हात्रे सह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी ,शिवसैनिक उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन महाव्यवस्थापक दीपक सावंत यांनी आपण लवकरात लवकर या रूटवर बस सेवा सुरू करतोय असे आश्वासन दिले. यामुळे नक्कीच गरीब, मध्यमवर्गीय, सामान्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असे कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले.