उल्हासनगर काँग्रेसच्या उपोषणास केलेल्या मांगण्याना अखेर उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने केले मान्य.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
दि. १० जुलै २०२४ पासून उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष रोहित साळवे यांच्या अध्यक्षतेखाली,”डम्पिंग हटाव” या मोहिमे अंतर्गत आमरण उपोषणाची सुरुवात नेताजी चौक येथे करण्यात आली.
सदर आंदोलनामध्ये मागील सात वर्षांपासून उल्हासनगर-५ येथील अनधिकृत डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी ची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू करण्यात येईल, हि प्रमुख मागणी असून व नवीन डंपिंग ग्राउंड जिथे स्थलांतर होणार आहे त्याच्या सध्या स्थितीची माहिती ,तसेच सदर डम्पिंग स्थलांतरित करे पर्येंत नागरिकांचा डम्पिंग मुळे होणारा त्रास कमी होण्यासाठी उपायोजना करणे, ह्यासाठी प्रामुख्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेचे अधिकारी श्री.मनीष हिवरे यांनी लेखी पत्राद्वारे थोडक्यात माहिती दिल्याने, सदर पत्र नाकारून उपोषण हे सुरू ठेवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला विधान भवन येथे सुरु असलेल्या अधिवेशना दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटेवार ह्यांनी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अझीझ शेख ह्यांना सादर प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश त्यांच्या दालनात दिले.
अखेर दुसऱ्या दिवशी सायंकाळी अतिरिक्त आयुक्त डॉ अशोक गवस, मनीष हिवरे ,गणेश शिंपी,एकनाथ पवार ह्यांनी उपोषणा स्थळी भेट दिली व उपोषण कर्त्यांशी चर्चा केली व केलेल्या मांगण्यानं संदर्भात लेखी निवेदन दिले.
सादर पत्रात प्रशासनाने नवीन डम्पिंग ग्राउंड तय्यार होऊन ,उल्हासनगर ५ येथे घनकचरा डंप करणे हे डिसेंबर २०२५ पर्येंत पूर्ण होईल अशी लेखी शास्वती दिली व नवीन डम्पिंग ग्राउंड ह्याच्या सध्या स्तिथी बद्दल छाया चित्र व कागद पत्र दिली व ह्या नंतर उपोषण करते ह्यांनी सर्व अधिकाऱ्यांना उल्हासनगर ५ येथील डम्पिंग ग्राऊंडला प्रत्येक्ष नेऊन नागरिकांना होणाऱ्या समस्या दाखवल्या व हे समस्या कमी करण्या साठी काय उपायोजना करण्यात ह्यवा ह्या संदर्भात चर्चा केली, व ह्या पुढे ओला कचरा ह्या डम्पिंग ग्राउंड वर फेकू दिला जाणार नाही व त्या साठी जे उपायोजना प्रशासनाला करायचे आहे ते त्यांनी ३ महिन्याच्या आत कराव्या असा इशारा रोहित साळवे ह्यांना दिला.
ह्या अखेर सायंकाळी ७ वाजता उपोषण स्थळी डॉ अशोक गवस ह्यांनी रोहित साळवे ह्यांना शरबत पाजून उपोषणाची सांगता झाली, व उपोषण माघे घेण्यात आले.
सादर उपोषणाला उल्हासनगर-४ व ५ मधून सर्व स्वयंसेवी संघटना, राजकीय पदाधिकारी आणि सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दोन दिवसात दिला, सुमार २००० च्या वर एकूण लोकांनी उपोषण स्थळी स्वाक्षरी देऊन समर्थन दिले.
सदर आंदोलनास “ह्यूमन राइट्स” संघटनेचे श्री. मनीष ठाकूर व त्यांचे सहकारी, नरेश रोहरा ,प्रकाश रोहरा व त्यांचे सहकारी, समाज सेवक श्री नरेश ताहिलरामानी , पत्रकार महेश मुलचंदानी,कायद्याने वाघाचे संस्थापक राज असरोंडकर,प्रदीप कपूर ,ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप मालवणकर,समाजसेवक श्री राजेश फक्के ,मोहन पगारे,जन शक्ती पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी ,राहुल काटकर , टीम ओमी कलानीचे कमलेश निकम ,पियुष वाघेला ,शिवाजी रगडे ,माजी नगरसेवक प्रशांत धांडे ,शिवसेना उबठा चे डॉ जेजे मानकर ,रोहित पवार मंच चे रणजित गायकवाड ,फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनांचे अध्यक्ष अजय जाधव ,लहुजी परिवर्तन सेनेचे गजांना चंदनशिव,भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सत्यशील उमाळे,शाहिद मारुती जाधव रिक्षा युनिओन चे दिगंबर हजारे,भूषण वैराळकर,हेमंत जाधव,ऍड कल्पेश माने,पराग मोरे,समाजसेवक संजय वाघमारे,निलेश भगत व अन्य अनेक जणांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला.
सादर उपोषणात पहिल्या दिवशीचे
उपोषण करते – रोहित साळवे, कुलदीप आयीलसिंघानी, किशोर धडके, मनीष ठाकूर, शैलेंद्र रुपेकर,रोहित ओव्हाळ.
दुसऱ्या दिवस उपोषण संपे पर्येंत श्री रोहित साळवे यांनी उपोषण सुरु ठेवले.
उपोषणाला उल्हासनगर काँग्रेसचे माजी नगरसेविका अंजली साळवे, महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे,शंकर अहुजा, आसाराम टाक,दिपक सोनोने,हितेश मठा,विशाल सोनावने,वामदेव भोयर,निलेश जाधव,राकेश मिश्रा,रजनीकांत शाह,हनुमंत वाघमारे,श्याम मडवी,ईश्वर जागियासी,दिपक गायकवाड, नारायण गेमनानी, राजेश मल्होत्रा, जयप्रकाश अनारडी, अमर जोशी,सिंधुताई रामटेके, विद्या शर्मा, उषा गिरी, फामिदा शेख,सॅम्युअल माऊची,संदीप बाटुले,अबा साठे,सुनील बेहेरानी,अजीज खान,शहबुद्दीन खान,विलास दुबे, गुविंदार कौर,मालती गवई,रेखा पाटेकर, राजेश वानखेडे, अमोल राऊत, मन्नू मनुजा, महेश मिरानी, पवन मिरानी, राज मोहन नायर,देव आठवले व उल्हासनगर काँग्रेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्तिथ होते.