क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौकाच्या नुतनीकरण कामाला सुरुवात.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक स्मारक समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून उल्हासनगर महानगरपालिके कडून मंजूर करून घेतलेल्या क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौकाच्या नुतनीकरण कामाचा शुभारंभ १ डिसेंबर २०२२ रोजीच्या क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पुर्वचे आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला होता.
त्यानंतर आज ५ फेब्रुवारी २०२३ रोजी ठरल्याप्रमाणे संबंधित ठेकेदाराने नुतनीकरण कामाला सुरुवात केली असून लवकरच एक सुंदर आणि आकर्षक स्मारक साकारण्यात येऊन उल्हासनगर शहरातील नाभिक समाज बांधवांना या स्मारकाच्या रुपाने एक स्फूर्ती स्थान मिळणार आहे.याबद्दल चौकाचे निर्माते मा. नगरसेवक,कायद्याने वागाचे संस्थापक मा.राज असरोंडकर,उल्हासनगर महानगरपालिकेचे आणि क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक स्मारक समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे खुप खुप आभार तसेच समस्त समाज बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन.