उमपा सर्वच शाळा शैक्षणिक वर्ष २०२५ मध्ये CBSE बोर्ड होणार शरद पवार गटाच्या नरेश गायकवाड यांना आयुक्तांचे आश्वासन.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर परिसरातील मनपा शाळेच्या दुरावस्थामुळे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील पालकांना नाईलाजास्तव आपल्या मुलांना शिक्षण घेणे कामी खाजगी शाळेत जावे लागत होते खाजगी शाळांची मनमानी फी ला कंटाळलेल्या अनेक पालकांच्या मुलांना गरिबी अभावी शिक्षण मिळत नव्हते शिक्षण फी वाढीच्या विरोधात कारवाईस हातबल जिल्हा शिक्षण, प्रशासनाच्या ना करतेपणामुळे अनेक विद्यार्थी पालकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते ह्या शिक्षण अव्यावस्थेच्या विरोधात मागील अनेक वर्षांपासून एकतर्फी लढत असलेले “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे” एकनिष्ठ कार्यकर्ते यांनी उल्हासनगर महानगरपालिका निडर आयुक्त साहेब श्री. अजीज शेख साहेब यांना महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मनपा शाळा ह्या सी बी एस सी बोर्ड पद्धतीत सुरु करावी ते ही पूर्णतः मोफत शिक्षण सर्व विदयार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे असे लेखी निवेदन दिनांक २८जून २०२४ रोजी केले त्यावर मा.आयुक्त साहेब यांनी साकारत्मक भूमिका घेत गुरवार दिनांक ११जुलै २०२४ रोजी आयुक्त साहेब यांच्या दालानात भेट देऊन मागणीचा विषय समजून घेऊन संबंधित शिक्षण प्रशासन अधिकारी यांना सी बी एस ई बोर्ड करनेकामी त्वरित सूचना केल्या व आवश्यक परवानग्या, आवश्यक दास्तावेजाची पूर्तता इत्याभूत माहिती संकलित करून पुढील १५ दिवसात संपूर्ण अहवाल मला सादर करावा असे आदेशीत करून शैक्षणिक वर्ष २०२५ काळात उपमा च्या सर्व शाळा ह्या सी बी एस सी बोर्ड पद्धतीने सुरु होतील असे “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे, माजी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष- ठाणे जिल्हा नरेश गायकवाड यांना आश्वासन दिले.