वालकस पूल दोन दिवसापासून पाण्याखाली.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
ठाणे जिल्ह्यातील वालकस नदीवरील पूल दरवरषीप्रमाणेच यंदाही पाण्याखाली गेला असून ग्रामस्थ आणि चाकरमानी दोन दिवसापासून गावातच अडकून पडले आहेत.
भातसा नदीवरील असलेला हा पूल कमी उंचीचा असल्याकारणानें थोड्या फार पावसाने पाण्याखाली जातो परिणामी रहदारी पूर्णपणे बंद होते अशावेळी गावकऱ्यांना पर्यायी रेल्वे रुळांतून प्रवास करावा लागतो. या जीवघेण्या प्रवासामुळे आतापर्यंत १४ लोकांनी आपला जीव गमावला आहे.
या परिस्थितीत गावकऱ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्यस्थितीत गावात गरोदर महिला व आजारी वयोवृध्द असताना वेळीस उपचार मिळणे अशक्य होऊन नाहक बळी जाण्याची शक्यता आहे.
अश्या परिस्थितीत गावकरी शासनाच्या दुर्लक्षित कारभाराने संतप्त असून तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.