Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

प्रशासक तथा आयुक्त डॉ.अझीझ शेख यांनी उल्हासनगरातील मुख्य रस्त्याची केली पाहणी.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

ऑगस्ट महिन्यापासून सण/उत्सवाचा कालावधी सुरू होत असल्याने पावसाळ्यामुळे होणारी रस्त्यांची स्थितो,नागरिकांची असलेली वर्दळ तसेच नवीन रस्त्याचे बांधकाम याचा आढावा घेणेसाठी ऑगस्ट दिनांक ०९/०८/२०२८ रोजी सकाळी ११:३० वाजता महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अझीझ शेख यांनी खालील मुख्य रस्त्याची पाहणी केली.

१) नेताजी चोक ते प्रभाग गार्डन मुख्य रस्ता,२) चालिया मंदीर रस्ता,३) स्वाती शांती प्रकाश शाळा ते दुर्गापाडा रस्ता.पहाणी करतांना संबंधित अभियंता व ठेकेदार यांना रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी श्री. तरूण सेवकानी, माजी नगरसेवक श्री.विजू पाटील, सहा. सावं. आरोग्य अधिकारी श्री. मनिष हिवरे,संबंधित बांधकाम ठेकेदार व जनसंपर्क विभागाचे कर्मचारी श्री.संजय पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights