Breaking NewsDombivliheadlineHeadline TodaySocialUlhasnagarUlhasnagar Breaking News

फ्रेंडशिप डे स्पेशल : डोंबिवलीतील पहिल्या वहिल्या “फ्रेंडशिप रनला” तुफान प्रतिसाद,धावपटुंच्या उत्साहापुढे हरला पाऊसही.

डोंबिवली : नीतू विश्वकर्मा

दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस संपूर्ण जगभरात फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) म्हणून साजरा केला जातो. याच फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने डोंबिवलीमध्ये प्रथमच आयोजीत करण्यात आलेल्या “डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 ला स्पर्धकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.  सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार तसेच कल्याण डोंबिवली रनर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे तुफान पाऊस पडत असूनही स्पर्धकांचा त्यापुढे तसूभरही उत्साह कमी झाला नाही.

मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी  डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४’ संपन्न झाली.  पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सेमी मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास ३,५०० धावपटुंनी  सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आबालवृद्धांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या १.६ किमी लांबीच्या फन रनमध्ये आयोजक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही सहभागी होत आनंद घेतला. येथील आप्पा दातार चौक ते घारडा सर्कलापर्यंत स्पर्धेत सहभागी होत त्यांनी इतर स्पर्धकांचे मनोबल वाढविले.

या स्पर्धेत सहभागी प्रत्येक   खेळाडूला ई-सर्टिफिकेट आणि मेडल यासोबतच सहभागी शाळा, संस्थांना मोमेंटो प्रदान करण्यात आले. कॉमनवेल्थ गेम्समधील ब्राँझ मेडल विजेत्या, अर्जुन क्रीडा पुरस्कार, शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार आणि आदिवासी खेलरत्न पुरस्कार विजेत्या  ॲथलिट कविता राऊत आणि सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

या उपक्रमामुळे आपल्या डोंबिवलीत आरोग्याची एक नवी चळवळ सुरु झाली, असल्याचे मत आयोजक रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ ची अभिनव संकल्पना राबवणारी कल्याण-डोंबिवली रनर्स ग्रुप ही मॅरेथॉनप्रेमी तरुण-तरुणींची ही संस्था गेल्या ९ वर्षांपासून असे अनेक  उपक्रम राबवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights