साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उल्हासनगर काँग्रेसचे अभिवादन.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
जगद्विख्यात साहित्यिक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे दसरा मैदान उल्हासनगर 5 येथे त्यांच्या स्मारकाला जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तथा आलेल्या सर्व नागरिकांना काँग्रेसच्या माध्यमातून लाडू चे वाटप करण्यात आले.
जिल्हा महासचिव दीपक सोनोणे,अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष शैलेंद्र रुपेकर,पर्यावरण विभाग अध्यक्ष विशाल सोनवणे,परिवहन विभाग अध्यक्ष आबा साठे, ईश्वर जग्याशी, समाधान अंभोरे, अमोल राऊत,ज्ञानेश्वर गायकवाड, आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.