भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लढणार उल्हासनगर 141 विधानसभा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र राज्यात काही महिण्यात विधानसभा निवडणुक होऊ घातल्या आहेत.अनेक मतदारसंघात तयारी जोरात सुरू आहेत. मागील अनेक वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाने मित्र पक्षाला उल्हासनगर विधानसभा (१४१) ही जागा सोडून सहकार्य केलं आहे. पक्षानें घेतलेल्या निर्णयाला अंतिम निर्णय मानून स्वागत केले आहे. आणि मित्र पक्षाच्या उमेदवारास सहकार्य ही केले.
मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, कार्यकर्त्यांची ही भावना बनली आहे कीं उल्हासनगर 141 ही जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लढणार आणि म्हणून तशी तयारी आणि जनतेत जाऊन काम करत आहेत. आज १०/०८/२०२४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन मुंबई येथे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला आहे.
येणाऱ्या काळात विधानसभा ही निवडणूक पंजा ह्या चिन्हावरलढली जाईल ही भावना सामान्य व्यक्ती पासून तें कार्यकर्त्याची आहे.