नेते मंडळी आपल्या कार्यक्षेञात मग्न,शासकीय यंञना भ्रष्टाचारात दंग!
उल्हासनगर :- नीतू विश्वकर्मा
शहरातील दिव्यांग अंध बांधवाना स्मार्ट छडी व साध्या छडी वाटप करण्याच्या नावा खाली उल्हासनगर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे उपायुक्त डाँ.सुभाष जाधव यांनी बोगस कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केला आहे. सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षातील ठराव क्रं.३३ दि.१३/१२/२०२२ मधील तरतुदी नुसार उमपातील क्षेत्रातील दिव्यांग बांधवासाठी स्मार्ट छडी वाटपाचा कार्यादेश दि.२४ एप्रिल २०२३ रोजी पुरवठादार “स्वामी इंटरप्रायजेस शिवम अपार्टमेंन्ट सेन्ट्रल हाँस्पिटल एरिया उल्हासनगर -३ यांना देण्यात आला. व त्यानुसार दि.४/५/२०२३ रोजी वाटप केल्याचे कागदोपञी दाखवण्यात आले आहे.माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार एकुण १२८(स्मार्ट छडी-५४ व साधी छडी -८४) छड्याचे वाटपापैकी केवळ एकच छडी वाटप केल्याचे दिसुन येत आहे.वास्तविकता आँनलाईन ह्या छड्याची किंमती बाबत चौकशी केली असता स्मार्ट छडी केवळ १४०० ते १५०० रु व GST धरुन जास्तीत जास्त २००० पर्यंत भेटु शकते,पण डाँ. सुभाष जाधव यांनी पुरवठादाराशी संगनमत करून ह्या छडीची किंमत प्रतिनग १२,९०० ऐवढी मान्यता प्राप्त करुन घेतली तर साधी छडी ची मुळ किंमत २०० रु ते ४५०रु असतांना त्याची किंमत ८२०० एवढी मंजुर करण्यात आली आहे.म्हणजे एकुण ७०% टक्के जास्त रक्कम वाढवण्यात आली आहे.विशेष म्हणजे ह्या खरेदी करण्यात आलेल्या छड्या जशाच्या तशा दिव्यांग विभागात पडुन आहेत.मग जर का ह्या छड्या वाटप करायच्या नव्हत्या तर खरेदी केल्याच कशाला,असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.
फेक कंञाटदार ” स्वामी इंटरप्राईजेस,शिवम अपार्टमेट सेंन्ट्रल हास्पिटल एरिया उल्हासनगर-3 ह्या ठिकाणा बाबत नरेश गायकवाड व अनेकांनी ह्या पत्ताचा शोध लावायचा प्रयत्न केला,पण ते कुठेच सापडले नाही!
त्या शिवाय कंञाटदाराने सादर केलेले कार्यालय पत्ता आढळून येत नाही. म्हणजेच हे कंञाटदार कंपनी व पत्ता एकुणच बोगस असुन,संपूर्ण प्रकरण फक्त थोतांड आहे.
केवळ तीन महिन्यातच संपूर्ण प्रक्रिया पुर्ण दाखवुन वाटप करत असल्याचे भासवण्यात आले आहे, त्यामुळे दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे उपायुक्त डाँ.सुभाष जाधव यांनी संगनमत करुन अथवा बोगस प्रकरण उभे करुन मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले, त्या शिवाय स्मार्ट छडी वर दिलेले ” टाँर्च” हे हास्यास्पद असुन ज्या दिव्यांग अंध बांधवाना डोळ्यानी काहीच दिसत नाही, त्यांच्या छडीला टाँर्च लावुन त्यांची चेष्टा करण्याचा प्रकार आहे व ह्या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन डाँ.सुभाष जाधव यांच्यावर योग्य ती चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.