उल्हासनगर महानगरपालिकेच्या इमारतीला गळती,सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महानगरपालिकेची इमारत 48 वर्ष जुनी झाली असून ती धोकादायक झाली आहे.पावसाळ्यात इमारतींच्या अनेक भागांना गळती लागलेली असून त्यांच्या स्पॉटच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे.
नगरपरिषद असताना 3 जून 1976 साली उल्हासनगर महानगर पालिकेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते.पुढ़े 1996 साली नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यावर मुख्याधिकारी यांची जागा आयुक्त आणि नगराध्यक्षांची जागा महापौरांनी घेघेतली.
मात्र इमारतीने जशी चाळीशी औलांडली तसतशी पावसाळ्यात या इमारतीला गळती लागू लागली असून प्रवेश द्वाराच्या वरील छताचे प्लस्टर अनेकदा अधिका्यांच्या गाड्यांवर कोसळल्याच्या घटनाघडल्या आहेत.त्यात सुदैवाने कोणतीही अघटित घटना घडली नाही.
महानगरपालिकेची नवीन इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे.पणगळतीची आणि प्लस्टर कोसळण्याची बाब आयुक्त अजीज शेख यांनीगांभीयनि घेऊन हे स्पॉट तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश कन्सल्टन अनिरुद्ध नाखवा,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरितक्त आयुक्तकिशोर गवस,शहर अभियंता तरुण शेवकानी यांना दिले.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता हर्षदप्रधान,नाखवा यांचे इंजिनिअर योगेश भोसले यांनी सर्विक्षण करूनगळतीचे आणि कमकुवत पलस्टरचे स्पॉट शोधून काढले आहेत.
त्यात महानगरपालिकेच्या प्रवेश द्वारावरील छत,अकाऊंट कार्यालयासमोरील पँसेज,चतुर्थ श्रेणी महिलांचे चेंजिंग रूम आदी स्पॉटचासमावेश आहे.है काम महानगरपालिकेचे कंत्राटदार सोनू खटवाणी करत असून एकेक पॅच घेऊन स्पेशल किमिकल ने सर्व स्पॉटची दुरुस्ती करण्यात येणार आहे.