10 हजारांहून अधिक महिलांनी बांधली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना राखी.
डोंबिवली : नीतू विश्वकर्मा
भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सर्वोच्च सण असलेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने डोंबिवलीतील १० हजारांहून अधिक महिलांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना राखी बांधून भावा-बहिणीचे नाते आणखी घट्ट केले.
रक्षाबंधनानिमीत्त सकाळपासूनच महिलांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये वृद्ध महिलांपासून लहान मुलींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. रविंद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम घेत असून यंदा त्यात वाढ होऊन तब्बल दहा हजार महिलांनी राखी बांधल्याचे दिसून आले.
डोंबिवली शहर हे केवळ एक शहर नाही, तर एक परिवार आहे. गेल्या 25 वर्षांच्या वाटचालीत या आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा, सुख-दुःखात सदैव साथ देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नांतून डोंबिवलीतील सर्व बहीणींसोबत एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आहे. रक्षाबंधनानिमित्त महिलांनी प्रेमाने बांधलेली ही राखी माझ्यासाठी खूप खास असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.
दरम्यान यावेळी मंत्री चव्हाण यांच्या प्रचंड जनसंपर्क आणि पारदर्शक दृष्टिकोनावर आधारित गाण्याचे लोकार्पण करण्यात आले. ज्याला उपस्थित महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला.