headlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
अतिवृष्टीमुळे होणारी दुर्घटनाग्रस्त परिस्थिती हाताळण्यात प्रशासन तत्पर.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हासनगर शहरातील प्रभाग समिती क्रमांक १ च्या हद्दीतील तानाजीनगर,एम आय डी सी रोड,उल्हासनगर -१ येथील विनोद राजाराम शिंदे यांचे २० वर्षांपूर्वी बांधलेल्या टि-जी पद्धतीच्या घराखालील जमीनीचे दि.२८ जुलै रोजी दु.१ वा.च्या सुमारास भुसख्खलन झाल्याने घराचे अतोनात नुकसान झाले, घराला भेगा पडल्या तसेच एका बाजूची भिंत पडली,गॅलरीचा भाग कोसळला,जिना तुटला तसेच शेजारीच राहणारे दीपक प्रफुल्ल बेहरा यांच्या घराचेही नुकसान झाले,
या दुर्घटनेची माहिती प्रभाग समिती क्रमांक १ चे सहाय्यक आयुक्त श्री अनिल खतूराणी यांना मिळताच त्यांच्या संपूर्ण पथकासह ते घटनास्थळी तात्काळ हजर झाले,अग्निशमन विभाग यांनाही पाचारण करण्यात आले.
पावसाची संततधार सुरू असतांना दुर्घटनाग्रस्त घराची पाहणी केल्यानंतर पुढील दुर्घटना टाळता यावी यासाठी अग्निशमक दलातील जवानांच्या साहाय्याने धोकादायक बाजू पाडण्यात आल्या,सदर घटनेचा पंचनामा करून शेजारील घरांना अतिदक्षतेचा ईशारा तसेच पुढील अप्रिय घटना टाळता याव्या यासाठी नोटीस बजावण्यात आली.
तहसील कार्यालयात ही घटनेची माहिती कळविल्यानंतर दि.२९ जुलै रोजी तलाठी श्री सोनवणे साहेब यांनी ही अतिवृष्टीमुळे भुसख्खलन होऊन दुर्घटनाग्रस्त झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामे तयार केले.
अतिवृष्टी ही एक नैसर्गिक आपदा असली तरी निसर्गाच्या प्रकोपामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर येतात आणि कधीही न पुसल्या जाणाऱ्या जखमा दुर्घटनाग्रस्त परिवारांच्या मनावर घर करून राहतात.
सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही,तात्काळ उपाय योजना राबविल्याने याचे सर्व श्रेय प्रभाग समिती क्रमांक १ चे सर्व अधिकारी,कर्मचारी,अग्निशमन विभाग उ.म.पा. यांनाच जाते.
तसेच दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत उपलब्ध करून दिल्यास या कुटुंबांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम शासनाकडून होणार असल्याने तात्काळ या कुटुंबांना मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मैनुद्दीन शेख यांनी शासनाकडे केलेली आहे.