उल्हासनगर महापालिकेच्या वतीने काढली तिरंगा रॅली.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
स्वांतंत्र्य दिनाचे औचित्य – साधत उल्हासनगर महापालिकेने तिरंगा रॅली काढुन घर घर तिरंगा हे अभियान सुरु केले असुन – सदर रॅली महापालिका ते – गोलमैदान इथ पर्यंत काढुन या रॅलीचा समारोप मिड टाऊन येथे केला असुन यावेळी कीट बॉल चे वाटप करुन प्रत्येकाना आपल्या आईच्या नावाने एक झाड लावुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अझीझ शेख यांनी केले आहे.
दरवर्षी शासनाच्या घर घर तिरंगा हे अभियान राबवन्याच्या सुचने नुसार उल्हासनगर महापालिका आयुक्त अझीझ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका ते गोल मैदान अशी तिरंगा रॅली काढन्यात आली. या रॅलीत महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी
झाले होते. दरम्यान या रॅलीचा समारोप मिड टाऊन येथे करण्यात आला असुन या ठिकाणी कीट बॉल चे वाटप करण्यात आले. दरम्यान प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावन्याचे आवाहन आयुक्त अझीझ शेख यांनी केले असुन त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले आहे. दरम्यान शहरातील सर्व नागरिकानी १५ ऑगस्ट रोजी आपापल्या घरावर एक तिरंगा झेंडा लावन्याचे आवाहन केले आहे. या रॅलीत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, डॉ किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, मनिष हिवरे, विनोद केणे, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी , जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, कर निर्धारक निलम कदम यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी हे सहभागी होवुन रॅली यशस्वी केली.