राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
संपूर्ण देशात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच पद्धतीने उल्हासनगर शहरात सुद्धा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरात ठिकठिकाणी राष्ट्रीय ध्वज लावून स्वातंत्र्य दिवस साजरा केला परंतु साजरा करत असताना.
उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय ध्वजाचा सन्मानाचा प्रोटोकॉल विसरून नको तीथे अर्थात कचरा कुंडी मटण,चिकन,दारूचे बार अशा घानेड्या जागांवर राष्ट्रीय ध्वज लावून राष्ट्रीय ध्वजाचा शहरभरात अपमान केला आहे.
याच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पच्छिम शहराचे अध्यक्ष मा.उज्वल महाले यांच्या नेतृत्वाखाली शहर कोशाध्यक्ष मा.ईश्वरभाऊ सोनवणे,शहर सचिव मा.निलेश देवडे,शहर उपाध्यक्ष मा.विजय पगारे,शहर IT प्रमुख मा.नितिन भालेराव,प्रभाग संघटक मा.मुकेश चौथमल,वरिष्ठ कार्यकर्ते मा.सुरेंद्र तिडके,वरिष्ठ कार्यकर्ते मा.रविंद्र महाले,वार्ड अध्यक्ष मा.सुरेशभाऊ बागुल या संपूर्ण शहर कार्यकारणीच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात लवकरात लवकर राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक शहरातून काढुन घेऊन सुरक्षित ठेवण्यात यावे नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.