Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

डायघर येथील वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण.

ठाणे  : नीतू विश्वकर्मा

डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवाराही उपलब्ध झाला आहे. तर याठिकाणी देशातील उत्तम दर्जाचे असे स्टेट ऑफ दि आर्ट असे प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी, यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करावा. यासाठी गरज पडल्यास १०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतुद केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने करण्यात येईल. असे आश्वासन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दिले. 

ठाण्यातील डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उभारण्यात आले आहे. तसेच जखमी प्राण्यांच्या शस्त्रक्रियेसाठी देखील सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. वाहनांच्या धडकेत, नैसर्गिक आपत्तीमुळे, विजेचा झटका लागून तसेच काही संरक्षित वनक्षेत्रात घुसखोरी करून वन्यप्राण्यांना तसेच पक्षांना इजा करणाऱ्या काही समाज कंटकांमुळे वन्यजीव अनेकदा जखमी होत असल्याचे निदर्शनास येत असते. या प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होतो. तर काहीना कायमचे अपंगत्व येते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे.

या केंद्रामुळे केवळ ठाणे, कल्याण, डोंबिवली येथीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वन्य प्राण्यांवर उपचार करणे सुकर होणार आहे. तसेच या ठिकाणी उपचारानंतर प्राण्यांना सुरक्षित पद्धतीने ठेवण्यासाठी पिंजऱ्यांची देखील उभारणी करण्यात आली आहे. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. शहरात आढळून येणाऱ्या बिबट्याना जेरबंद करून त्यांना सुरक्षित ठिकाण मिळेपर्यंत काही काळ या केंद्रात ठेवण्यासाठी विशेष पिंजरेही या केंद्रात उभारण्यात आले आहेत. तसेच शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारांसाठी आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित वैद्यकीय कमर्चारी डॉक्टर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights