काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. नाना भाऊ पटोले व माजी मंत्री श्री. नसीम खान यांनी केला उल्हासनगरचा एकदिवसीय दौरा.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले व माजी मंत्री नसीम खान यांच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सचिव श्री. मनोज शिंदे, पर्यावरण प्रदेशाध्यक्ष श्री. समीर वर्तक उपस्थित होते. काँग्रेसच्या नेहरु चौक येथील पक्ष कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या नेहरू भवन या इमारतीचे उद्घाटन नाना भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. उल्हासनगर शहराच्या धोकादायक इमारती, वाढलेली गुन्हेगारी, मुस्लिम दफनभूमी अश्या विभिन्न प्रश्नांवर सामाजिक संघटना व पत्रकारांसोबत चर्चा केली. तसेच वाढती गुन्हेगारी व बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थे संबंधी उल्हासनगर परिमंडळ ४ उपायुक्त यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर उद्घाटन कार्यक्रमानंतर काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा स्वामी शांती प्रकाश हॉल, कुर्ला कॅम्प येथे आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच अनेक युवा व महिलांना पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उल्हासनगर शहराच्या प्रश्नांसाठी काँग्रेस नेहमीच झगडत राहील व कुठलीही तडजोड करणार नाही तसेच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद दिली जाईल असे नाना भाऊंनी यावेळेस सांगितले.
नवीन कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील व नाना भाऊ व इतर नेत्यांनी एवढा वेळ उल्हासनगर शहरासाठी दिला त्याबद्दल रोहित साळवे यांनी आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.