Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन.

कल्याण  : नीतू विश्वकर्मा

गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहिला असून अद्यापही शहरांतील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीयेत. उलट या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे शहरात दोन दोन तास वाहतूक कोंडी होत असल्याविरोधात आज युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. येथील शहाड पुल परिसरात युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.

कल्याण डोंबिवलीतील अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झाली असून नागरिक तर मेटाकुटीला आले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज तास न तास वाहतूक कोंडी होण्यासह नागरिकांना मणक्याचे आजारही झाले आहेत. परंतु त्यानंतरही गेंड्याच्या कातडीचे केडीएमसी प्रशासन अजिबात त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

या पार्श्वभुमीवर आज कल्याण शहर युवक काँग्रेसच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. शहाड पुल परिसरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये बसून या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. जनतेचे हाल होत असूनही केडीएमसी प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे नसल्याचे सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी विवेक यवगर, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights