मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या झंजावातापुढे सगळे सर्व्हे फेल ठरणार – शिवसेना शहरप्रमूख रवी पाटील
कल्याण : नीतू विश्वकर्मा
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये विकासाचा अक्षरशः झंजावत सुरू असून या विकासकामांच्या झंजावातापुढे सर्व सर्व्हे फेल ठरतील असा विश्वास कल्याण पश्चिमेचे शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकीचे बनत चाललेले वातावरण या पार्श्वभूमीवर प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण बनू लागले आहे. सर्वच पक्षांमध्ये बरेच इच्छुक उमेदवार असून आमच्या पक्षातही काही जणांची इच्छा आहे. त्यात गैर काही नाही. तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण गणेशोत्सवानिमित्त्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले.
पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होऊ दे…
कल्याण पश्चिमेतील जनतेची समृद्धी – भरभराट होवो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहो. यासोबतच राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बाणून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच होवोत अशी आपण गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करत असल्याचेही रवी पाटील यांनी सांगितले.
इच्छुक आहेच मात्र पक्षादेश मान्य…
गेल्या 32 वर्षांपासून आपण शिवसेनेमध्ये एकनिष्ठेने काम करत आहोत. आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहोत हे जगजाहीर आहे. आपण पक्षालाही ते सांगितले असून त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. मात्र उमेदवार कोण असावा याचा अंतिम निर्णय पक्ष घेत असतो. तो जो काही निर्णय असेल त्याचा आपण मान राखूनच काम करू अशी भावनाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंच्या झंजावातापुढे सगळे सर्व्हे फेल ठरणार…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांच्या
झंजावातापुढे सगळे सर्व्हे हे फेल ठरतील. गेले 20 वर्षे आपण शिंदे साहेबांसोबत काम करत आहोत. ते बोलतात कमी मात्र काम प्रचंड करतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच पुन्हा सत्तेमध्ये बसणार असा ठाम विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.