Breaking NewsheadlineIllegal ConstructionUlhasnagar

सोनार गल्ली इथे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 

उल्हासनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 188 / 2023 महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52/53/54 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 397(अ) अन्वये  जेठनिंद करमचंदानी, (सहायक आयुक्त,प्रभाग समिती, उल्हासनगर महानगरपालिका) यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली.

 उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क 2चे कार्यक्षेत्रात  सोनार गल्ली, उल्हासनगर 421002 या ठिकाणी महापालिकेची 15फुट X20 फुट क्षेत्राची मोकळी जागा होती सदर ठिकाणी दि 05/03/2023 रोजी साप्ताहिक सुटीच्या दिवशी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याबाबत संबंधित बीट मुकादाम श्री. दिलीप भोईर यांनी दिनांक 006/03/2023 रोजी पाहणी अहवाल सादर केला होता. तसेच स्वच्छता निरीक्षक श्री. विजय बेहनवाल यांनी देखिल सदर ठिकाणी जुने सार्वजनिक शौचालय होते तिथे महापालिकेच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशिर बांधकाम सुरु असल्याचा लेखी अहवाल दिनांक 06/03/2023सादर केला होता. सदरच्या अनुषंगाने दिनांक 06/03/2023 रोजी पाहणी केली असता आहुजा नावाच्या इसमाने महापालिकेच्या मोकळ्या जागेवर व दोन दुकानांचे बेकायदेशिर बांधकाम केल्याचे निर्दनास आले. सदरचे बांधकाम हे महापालिकेच जागेवर बेकायदेशिर केल्याचे निदर्शनास आल्याने दिनांक 06/03/2023 रोजी आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशानुसार सदर ठिकाणी निष्कासन कारवाई करण्यात आली.

 सदर ठिकाणी पुनः अतिक्रमण होऊ नये यासाठी दिनांक 08/03/2023रोजी निष्कासीत केलेल्या बांधकामाच्या ठिकाणी महापालिकेचा फलक देखिल लावण्यात आला. आहुजा या इसमाने महापालिकेच्या जागेवर बेकायदेशिरपणे दोन दुकानचे बांधकाम केल्याने त्याचेवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील कलम 52,53,54 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 397 (अ) अन्वये स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणेसाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांचे आदेशानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आयुक्त तथा प्रशासक यांचे मान्यतेने अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी आज अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इसमाविरुध्द स्थानिक पोलीस स्टेशनला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 53 54 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 397 (अ) अन्वये गुन्हा दाखल करणेसाठी सहाय्यक आयुक्त यांना प्राधिकृत केले आहे. 

त्यानुसार टिल्लू आहुजा यांनी  बॅरेक क्रमांक 352 सोनार गल्ली, उल्हासनगर 421002 या ठिकाणी महापालिकेच्या मोकळ्या जागेवर सुमारे 15 X 20 फूट क्षेत्रफळाचे दोन दुकानांचे बेकायदेशिर बांधकाम केल्याने त्याचे विरूद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52,53,54 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 397 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी PSI राठोड तपास अधिक तपास करत आहेत अशी माहिती नोडल अधिकारी श्री गणेश शिंपी यांनी दिली‌.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights