राष्ट्रवादी काँग्रेस उल्हासनगर शहर च्या वतीने उपहासनगर ४ येथे प्रमुख पदाधिकारी आढावा बैठक व जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे संपन्न.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
राष्ट्रवादी काँग्रेस उल्हासनगर शहर (जि.) च्या वतीने स्माश टर्फ, प्रभात गार्डन येथे प्रमुख पदाधिकारी आढावा बैठक व जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी, सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगर पालिकेच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले. तसेच, १४१ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासोबतच १४२ कल्याण पूर्व आणि १४० अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ (राखीव) या तिन्ही मतदारसंघात पक्ष बांधणीची जबाबदारी कलानी यांची राहिल, असे सांगितले. यावेळी मी बुथ पातळीपर्यंतच्या पक्षबांधणीबाबत मार्गदर्शन केले. शहराध्यक्षा सौ. पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.