kalyanSocial

जायंटस् ग्रूप ऑफ कल्याण मिड टाऊनतर्फे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव.

कल्याण : नीतू विश्वकर्मा

आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम काम करून समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनकडून समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कल्याणच्या के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. सुप्रसिद्ध व्यावसायिक उध्दव रुपचंदानी, केडीएमसी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार प्रदीप गुप्ता आणि शिक्षिका विशाखा सुतार या चार मान्यवरांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यापूर्वी  जायंटस् ग्रुपच्या कल्याण, भिवंडी, उल्हासनगर येथील सदस्यांनी केलेल्या बहारदार नृत्य, गायनाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. ज्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा या संकल्पनेद्वारे सादर
झालेल्या सांस्कृतिक सणांच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विविध क्षेत्रात राहून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवाने या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन सोडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जायंटस् ग्रुप 1 सीचे व्हाईस प्रेसिडेंट किशोर देसाई यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कांचन नेने यांनी केले.

यावेळी जायंटस् ग्रुप फेडरेशनचे नुरुद्दीन सेववल्लाह, सुप्रसिद्ध अभिनेते संजय कुलकर्णी, सेंट्रल कमिटी मेंबर गगन जैन, मनोहर पालन, जीवराज नगारिया, जायंटस् ग्रुप फेडरेशन चे प्रेसिडेंट डॉ. नूर खान, व्हाईस प्रेसिडेंट किशोर देसाई, जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊनचे अध्यक्ष संजय गुप्ता, जायंटस् ग्रुप ऑफ मिडटाऊन सहेलीच्या अध्यक्षा उर्वशी गुप्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights