नॅशनल जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल : कल्याणच्या गुरुनानक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावली 10 पदकं.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
नांदेड येथे गेल्या आठवड्यात झालेल्या 21 व्या सब-ज्युनियर, ज्युनियर आणि सिनीयर नॅशनल जम्परोप स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावत बाजी मारली. या राष्ट्रीय स्पर्धेत पंजाब, जम्मू कश्मीर, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली अशा विविध राज्यांतील जवळपास 300 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मला -मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ठाणे जिल्ह्याने 11 सुवर्ण , 11 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 24 पदके पटकावली. त्यामध्ये गुरुनानक इंग्लिश हायस्कूल, कल्याण या शाळेतील मुला मुलींनीही सहभाग घेतला होता. गुरुनानक इंग्लिश हायस्कूलच्या मुला-मुलींनी 8 सिल्वर आणि 2 कांस्य अशी 10 मेडल्स पटकावली. शाळेच्या मुला-मुलींनी अतिशय उत्तम – दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका बलजीत कौर मारवाह यांनी सर्व खेळाडूंचे खूप कौतुक केले.
दरम्यान ठाणे जिल्ह्यातील मुला- मुलींचे सराव शिबीर ठाणे जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या कार्यवाह लता पाचपोर मॅडम आणि इंडीया कोच अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. महाराष्ट्राच्या यशात ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली त्याबद्दल कार्यवाह लता पाचपोर आणि प्रशिक्षक अमन वर्मा यांचेही खूप कौतुक करण्यात आले.
सुवर्णपदक – भुमिका नेमाडे, पद्माक्क्षी मोकाशी, दक्षिता देकाटे, योगीता सामंत, भाग्यश्री पाटील, पारोल झनकार, तन्वी नेमाडे, अनिश अयंकर, हर्षित शहा, विहंत मोरे, ईशान पुथरन रौप्यपदक – काजल जाधव, वंश हिरोडे, वेदांत सरकटे, अवनी पांडे, नैवदया सिंग, ख्याती यादव, अनन्या यादव, रूद्र भगत, सुक्रुता बेंडाळे, अयंश रोठे, रोनक साळवे,कांस्य पदक – अयान यादव, पर्वा शिरसाठ