रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त.

उल्हासनगर – नीतू विश्वकर्मा
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची उल्हासनगर शहरजिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून रिपाइं चे उल्हासनगर शहर अध्यक्ष भगवान भालेराव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून रिपब्लिकन पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कृती करीत आल्यामुळे भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे सचिव ; ठाणे प्रदेश संपर्क प्रमुख ; पक्ष निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उल्हासनगर शहर अध्यक्ष भगवान भालेराव यांना रिपब्लिकन चळवळीमुळे उपमहापौर पद प्राप्त झाले होते.मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या विरुद्ध पक्ष संघटने बाबत अनेक तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या.पक्षाविरुद्ध कारवाई होत असल्याचे त्यांच्यावर आरोप झाले. त्यामूळे पक्ष शिस्तभंगाची कारवाई म्हणून भगवान भालेराव यांना पक्षातूननिलंबित करण्यात येत असून रिपब्लिकनपक्षाची उल्हासनगर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात अल्याची अधिकृत घोषणा सुरेश बारशिंग यांनी आज केली.