Breaking NewsheadlineHeadline TodaySocialUlhasnagarUlhasnagar Breaking News

उल्हासनगर शहरात गणेशोत्सवादरम्यान स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, प्रशासक तथा आयुक्त विकास ढाकणे साहेब यांच्या आदेशानुसार, व अतिरीक्त आयुक्त किशोर गवस, अतिरीक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपआयुक्त सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे साहेब,मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली दि. 18/09/2024 पासून शहरात सर्व प्रभागात स्वच्छता ही सेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सण उत्सवाचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी रस्त्यावर वाढली आहे. शहरा बाहेरून मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिक शहरात येत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छता देखील ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रभाग समिती क्र 03, अंतर्गत पॅनल क्र 11 मध्ये एम. एम. ग्रूप, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, स्टेशन रोड, उल्हासनगर – 3 येथे गणेश मंडळ परीसरात स्वच्छता ही सेवा अंतर्गत “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” मोहीम नुसार विशेष सफाई अभियान राबविण्यात आले. सदर अभियानात एम. एम. ग्रूप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी – सदस्य, राजेश थिटे ,विजय गावित साहेब,  जितेंद्र राठी  व  आकाश शिंदे तसेच मुकादम व सफाई कर्मचारी उपस्थित होते. सदर अभियानात स्वच्छता शपथ घेऊन संपूर्ण गणेश मंडळ परीसरात सफाई व स्वच्छता करण्यात आली.

तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमा अंतर्गत, श्रीमती.सिमरन लाल जेसवानी सखी फाऊंडेशन,समाज सेवक मंसुलकर साहेब, स्थानिक नागरिक व उल्हासनगर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य स्वच्छता विभाग प्रभाग समिती क्रमांक 03 अंतर्गत पॅनल न.14 मध्ये विशेष स्वच्छता मोहीम, पालांडे चाळ सेवा संघ मित्र मंडळ उ. न. 04 येथे राबविण्यात आले, सदर मोहीम अंतर्गत सार्वजनिक गणेश मंडळ व परिसर स्वच्छता करून नागरिक यांच्या सहकार्याने साफसफाई व जनजागृती करण्यात आली व स्वच्छता शपथ घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights