उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पदासाठीची मोर्चेबांधणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून मा. शांताराम निकम यांच्याच नावाची चर्चा.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव हे पक्षविरोधी कारवाया करत असल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे अध्यक्ष पद कोणाकडे द्यावे याविषयी रिपब्लिकन ज्येष्ठ नेते बी बी मोरे यांच्या कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात झाली.तेंव्हा पक्षाशी एकनिष्ठ असणारे,अनेक पक्षाच्या प्रमुख पदांची ऑफर झुगारलेले,माजी नगरसेवक, माजी शिक्षणमंडळ सदस्य शांताराम निकम यांची सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने मागणी केली.
उल्हासनगर महानगरपालिकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शांताराम निकम यांच्या हस्ते हार अर्पण करून ,फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
शांताराम निकम उल्हासनगरमधील सर्वदूर परिचित व्यक्तिमत्व असल्यामुळे पक्ष वाढवण्यास मदत करू शकतात.असे प्रमुख कार्यकर्त्यानीं सांगितले.
सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह पक्षनेते केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार असल्याचे बी बी मोरे यांनी सांगितले.