उल्हासनगर महानगरपालिकेच्या उत्तम नियोजनाने गणेशोत्सव उत्साहात संपन्न: 11,595 मूर्तींचे विसर्जन, 17 टन निर्माल्य संकलित
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिकेत आयुक्त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे सर्व विसर्जन घाटावर गणेश विसर्जन व्यवस्थित पार पडले.अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व किशोर गवस, उपायुक्त सुभाष जाधव, प्र.शहर अभियंता तरूण शेवकानी,विद्युत अभियंता हनुमंत खरात,पाणीपुरवठा विभाग अभियंता परमेश्वर बुडगे, सहा.आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे व एकनाथ पवार व नोडल अधिकारी गणेश शिंपी व सर्व प्रभाग अधिकारी व अग्निशमन विभाग प्रमुख सुरेश भोम्बे यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी विसर्जनाची जबाबदारी पार पाडली.
उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात विसर्जन घाटावर विर्सजनसाठी आलेल्या गणेश मुर्त्यांची माहिती
👇🏻
●एकूण इकोफ्रेंडली / शाडु मातीच्या विसर्जित मूर्तींची संखा-2,394
●एकूण पीओपी विसर्जित मूर्तीची संख्या -9164
●एकूण खंडित विसर्जित मुतीच्या संख्या – 37
——————————- एकूण 11,595 मुर्त्यांचे विसर्जन झाले.
यादरम्यान अंदाजे 17 टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
सर्व सफाई कर्मचारी व मुकादम व आरोग्य निरीक्षक यांनी यावेळी मोठी मेहनत घेतली.
गणेशोत्सवात सर्व गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला व प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला. याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सर्व मंडळांचे नागरिकांचे व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.