Ambernath breaking newsBreaking NewscelebratingCelebration dayfestivalheadlineHeadline TodayMumbaipoliticsSocialUlhasnagar

अंबरनाथ शहराचा मानबिंदू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल या लोकप्रिय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यचे मुखायमंत्री एकनाथ शिंदे नी उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला.

 

अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा


अंबरनाथ शहराचा मानबिंदू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल या लोकप्रिय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यचे मुखायमंत्री एकनाथ शिंदे नी उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला.

मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच अंबरनाथ शहरात आलो असल्याने या महोत्सवाच्या निमित्ताने प्राचीन शिवमंदिराला भेट देऊन भगवान श्री भोले शंकराची मनोभावे पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या आवारात रुद्राक्षांनी तयार केलेल्या शिवशंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले व मंदिराच्या भव्य पटांगणात महाआरती केली. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल हा सोहळा आज अंबरनाथ शहराची वेगळी ओळख बनला असून या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत अंबरनाथ शहरात येऊन आपली कला सादर करत असल्याचा अभिमान वाटतो,  असे मत  याप्रसंगी व्यक्त केले. 

अंबरनाथ शहरातील शिवमंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून त्यांच्या परिसर विकासासाठी मुख्यमंत्री झाल्यावर १३८ कोटी रुपये दिले. तसेच शहरातील वेगवेगळ्या विकासकामांसाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे या शहरात शूटिंग रेंज, काँक्रीटचे रस्ते, नाट्यगृह, कचरा विघटनाचा प्रकल्प अशी अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. आगामी काळात ही सगळी विकासकामे पूर्ण झाल्यावर एक सुनियोजित शहर अशी या शहराची वेगळी ओळख निर्माण होईल अशी अपेक्षा यासमयी बोलताना व्यक्त केली. 

या शहरातील विकासकामांना गती देऊन ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, मा.आमदार रवींद्र फाटक, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना सचिव सुशांत शेलार,

अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी,उल्हासनगर चे शहर प्रमुख रमेश चव्हान बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व स्थनिक पदाधिकारी, तसेच कलारसिक मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights