उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रशासकीय व तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांची बंपर पदोन्नती.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
आयुक्त विकास ढाकणे यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे महानगरपालिकेत प्रथमच प्रशासकीय सेवेत सहाय्यक आयुक्त या पदावर तीन जणांची वर्णी लागली.अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय खेडकर व सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांनी सामान्य प्रशासन विभागाची अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान केलेली असून पहिल्या टप्प्यात 3 सहाय्यक आयुक्त, 2 अधीक्षक, 12 वरिष्ठ लिपिक, 6 वीजतंत्री व 17 तारतंत्री या पदांवर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करून त्यांची येणारी दिवाळी गोड केली.
आचारसंहितेनंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासून त्यांचाही पदोन्नतीसाठी निर्णय होणार आहे.महानगरपालिकेत अनेक वर्षापासून प्रभारी कर्मचाऱ्यांवर प्रशासन सुरू असून प्रथमच सहाय्यक आयुक्त हे महापालिका सेवेतील पदोन्नत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत.