विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर , उल्हासनगर काँग्रेस काढणार “परिवर्तन संवाद यात्रा ” !
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त उल्हासनगर काँग्रेस तर्फे “परिवर्तन संवाद यात्रा” चे लोकार्पण. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेस तर्फे हि यात्रा सुरु करण्यात येणार आहे.
महात्मा गांधीजींचे तीन महत्वाचं तत्व. सत्य , अहिंसा आणि निस्वार्थ सेवा ह्या मूळ सिद्धांतच्या आधारावर हि यात्रा काढण्यात येणार आहे.
यात्रेच्या माध्यमातून उल्हासनगर काँग्रेसचे पदाधिकारी सोबत संपूर्ण शहारत फिरून नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद , चर्चा व कॉर्नर सभा घेणार आहे. नागरिकांचे स्थानिक समस्या जाणून त्यांना सध्याच्या महायुती सरकार व त्यांचे आमदारांच्या खोट्या विकासाच्या मॉडेलचा पर्दाफाश करणार आहे. विशेषतः अंबरनाथ विधानसभेतील पाणी प्रश्न , वाढते प्रदूषण, वाढती गुन्हेगारी ,बेरोजगारी, आरोग्य सुविधांचा बोजवारा ,क्रीडा असुविधा , प्रशासनातील भ्रष्टाचार , अश्या अनेक प्रश्नां संदर्भात नागरिकांना अवगत करून, येणाऱ्या विधानसभेत १४० अंबरनाथ ,१४१ उल्हासनगर ,१४२ कल्याण ह्या तिन्ही विधानसभेत परिवर्तन करण्याचे आव्हान करणार. तसेच अंबरनाथ मध्ये मी इच्छुक उम्मेदवार असल्याने आमच्या विकासाची संकल्पना व विधानसभेचा मॅनिफेस्टो जनते समोर नेणार आहे.
सदर यात्रा हि २ ऑक्टोबर ते निवडणुकीचा प्रचार संपे पर्येंत सुरु राहील , सोबतच यात्रेच्या अनुषंगाने समविचारी लोकांची भेट , महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व नेत्यांची भेट देखील घेण्यात येईल.
सदर लोकार्पणच्या वेळी उल्हासनगर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, प्रो गेमनानी , महेश अहुजा , अशेराम टाक ,फामिदा सैयद ,दीपक सोनवणे ,निलेश जाधव , निहाल रुपेकर ,वामदेव भोयर ,राजेश फाक्के, युवराज पगारे सोबत अनेक पदाधिकारी उपस्तिथ होते.