स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आंतरराष्ट्रीय देहव्यापार रॅकेट उघड; प्रहार जनशक्ती पक्षाची कडक कारवाईची मागणी।

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
वारंवार समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी, तसेच स्थानिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या वृत्तांकडे दुर्लक्ष करून, स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता थेट ठाण्यातून आलेल्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या घटनेने समाजात मोठी चिंता निर्माण केली आहे.
स्थानिक पोलिसांनी या तक्रारींची दखल का घेतली नाही, आणि १५ परदेशी महिलांचा चाललेला देहव्यापार त्यांच्या लक्षात कसा आला नाही, हे संशयास्पद प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
याशिवाय, तरुण पिढीला या परदेशी महिलांच्या देहव्यापारातून वाचवण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज गृह सचिवांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.