महावितरण कार्यालयावर उल्हासनगर काँग्रेसच्या धडक मोर्चा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय आकाश कॉलनी उल्हासनगर 5 धडक मोर्चा काढण्यात आला शेकडो नागरिकांनी महायुती सरकार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ घोषणा करत आपल्या समस्यांचा पाढा वाचला उल्हासनगर ४ आणि ५ मध्ये वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा, वाढीव लाईट बिल, स्विचिंग स्टेशन, सब स्टेशन आधी समस्या या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आला यावेळी शिष्टमंडळाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीपकुमार बाबुराव कुंभरे, व अधिकारी प्रविण चकोले, जितेंद्र फुलपगारे, यांचेसी चर्चा करुण जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्याय अशी मागणी केली या वेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध वस्त्यांमधल्या विविध समस्या मांडल्या.
पत्रकारांशी बोलताना रोहित साळवे ह्यांनी ह्या सर्व समस्यां साठी महायुती सरकार व स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर व आमदार गणपत गायकवाड ह्यांनी कुठला हि पाठपुरावा केल्या नसल्याने जबाबदार असल्याचे सांगितले.
माजी नगरसेविका अंजलीताई साळवे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा महाकाळे, सीमा आहुजा, सिंधुताई रामटेके, सेवा दल अध्यक्ष शंकर आहुजा, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, सुनील शहरांनी, नाणीक आहुजा, महेश आहुजा, महादेव शेलार, राजेश फक्के,महासचिव दीपक सोनोने, प्रवक्ते आसाराम टाक, नारायण गेमनानी, रोहित ओहाळ,शैलेंद्र रुपेकर, विशाल सोनवणे, संतोष मिडे, आबा साठे, आबा पागारे, मनोहर मनुजा, नाना अहिरे, आदी पदाधिकाऱ्यांसोबत शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते.