उल्हासनगर मध्ये संविधान दिवस साजरा.


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर कॅंप ३ येथील सम्राट अशोक नगर मध्ये अशोका फाऊंडेशन च्या वतीने संविधान दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उद्देशिकेचे वाचन करुन शपथ घेण्यात आली.
उल्हासनगर कॅंप ३ येथील सम्राट अशोक नगर या ठिकाणी भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त अशोका फाऊंडेशन च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधानातील उद्देशिकेचे वाचन करुन संविधाना प्रति आदर आणि संविधान बचावा साठी शपथ घेण्यात आली. यावेळी अशोका फाऊंडेशन चे संस्थापक शिवाजी रगडे . माजी नगरसेविका सौ . सविता तोरणे रगडे, कमलेश निकम भगवान मोहिते अध्यक्ष प्रमोद घनबहादुर, सुनिल खांडेकर समधान वाघ दुर्गेश पांडे अशोक जाधव अरुण अहिरे संदीप खर्चन यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . विकास ढोके यांनी केले .