उल्हासनगर शहर स्थापना दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ सपन्न.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहर स्थापना दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ दिनांक ०८ ऑगस्ट,२०२४ रोजी विराट अंबे स्पोर्ट्स क्लब, तरण तलाव,महापालिका मुख्यालयामागे, उल्हासनगर-३ येथे मा.महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरूवात मा.आमदार श्री.कुमार आयलानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली.जनसंपर्क अधिकारी सौ.छाया डांगळे यांनी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उल्हासनगर शहराची ऐतिहासीक पाश्र्श्वभुमो व कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगीतली, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्री.जमीर लेंगरेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली,त्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध योजनांची त्यांनी थोडक्यात माहिती दिली. त्यामध्ये “माझी लाडकी बहीण,घरोघरी तिरंगा, जिल्हा कौशल्य विकास,अन्नपुर्णा, तिर्थयात्रा यांचा प्रामुख्याने उल्लेख अतिरिक्त आयुक्तांनी केला.
मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी ३ कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय ध्वजासह रॅली काढण्यात आली होती.सदर राष्ट्रीय ध्वजाची उत्तमरित्या निगा राखणारे श्री. आशिष यादव यांचा सत्कार मा.आमदार श्री.कुमार आयलानी व महापालिका आयुक्त डॉ.अझीझ शेख यांचे हस्ते करण्यात आला.
उप-आयुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी “माझी लाडकी बहीण” योजनेबाबत थोडक्यात माहिती दिली. तसंच सदर योजनेचे अर्ज करतांना होणा-या त्रुटी टाळणेबाबत त्यांनी सर्वांना आवाहन केले.पर्यावरण विभाग प्रमुख सो. विशाखा सावंत यांनी राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत वृक्ष
लागवडीसाठी विशेष उपक्रम (एक पेड माँ के नाम) या उपक्रमाची माहिती देवून पर्यावरण संवर्धनासाठी, हवा प्रदुषणास आळा बसावा, ऊर्जा संवर्धन,जलसंवर्ध याकरिता वृक्षांचे महत्व त्यांनी विषद करून यासंदर्भांतील “हरीत शपथ सर्व उपस्थितांसह घेण्यात आली.त्यांनतर नशामुक्ती अभियानावर एस.एस.टी. कॉलेज व एस.एच.एम. चे प्राचार्य व विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.तसेच “नशामुक्ती” व “घरोघरी तिरंगा बाबत रॅलीचे आयोजन एस.एस.टी. कॉलेज व स्वामी हंसमुनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले.
मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी ३ कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय ध्वजासह रॅली काढण्यात आली याची नोंद राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय रेकॉर्डमध्ये झाल्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. अझीझ शेख यांचा सत्कार मा.आमदार श्री. कुमार आयलानी व रिजन्सी अंन्टेलिया ग्रुपचे श्री. संजय अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.