उल्हासनगर महानगरपालिकेत मालमत्ता कर विभागाच्या गुणवत्तेसाठी नवी योजना.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागात कामकाज अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व अपात्र कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन गुणवत्तावाढ करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे.
धोरणाचा उद्देश
विभागातील कर्मचाऱ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी व निवड प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ५ व १० डिसेंबर २०२४ रोजी प्रशिक्षण सत्र आणि विभागीय परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. हे सत्र सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असून, त्या माध्यमातून गुणवत्तेचा आधार तपासला जाईल.
परीक्षा प्रक्रिया
पात्रता निकष: विभागीय परीक्षेत किमान ४०% गुण मिळविणे अनिवार्य आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांनाच विभागात कायमस्वरूपी पदे दिली जातील.
प्रशिक्षण सत्र: कर्मचाऱ्यांसाठी परीक्षेपूर्वी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
पारदर्शकता: गुणवत्तेवर आधारित कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे.
परीक्षेची वेळापत्रक
विभागाच्या कार्यक्षेत्रात सुधारणा
या उपक्रमामुळे विभागातील निष्क्रिय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करून योग्य पदावर स्थान देण्यात येईल. तसेच, विभागातील गुणवत्तापूर्ण सेवा व सुधारणा करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- प्रशासनिक आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका
मालमत्ता कर विभागात गुणवत्ता असलेले व अनुभवी कर्मचारी उपलब्ध व्हावेत. तसेच विद्यामान ज्या कर्मचाऱ्यांना काहीच येत नाही अशा वशिलेबाजांना विभागातून हलवण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्याचे आयुक्तांनी निश्चित केले आहे.
यामुळे गुणवत्ता असलेले व हुशार कर्मचारी आपल्या प्रयत्नाने परिक्षेतून यश संपादन करून या विभागात नियुक्ती मिळवू शकतात यासाठी वरील प्रमाणे परीक्षा आयोजित केलेली आहे.