उल्हासनगर महानगरपालिका कडून क्रीडा धोरणावर विचारविनिमयासाठी बैठक.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येत आहे. सोमवार, २ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात ही बैठक होणार आहे.
या बैठकीत शहरातील क्रीडा शिक्षक, क्रीडा तज्ञ, तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी सहभागी होऊन आपल्या सूचना व उपाययोजनांचा प्रस्ताव मांडावा, असे आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.
बैठकीत क्रीडाविषयक सुविधा उभारणी व क्रीडा धोरणाचा कार्यान्वय यावर सखोल विचारविनिमय होणार आहे. शहरातील क्रीडा क्षेत्रातील समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयी सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच, सहभागी झालेल्या सदस्यांनी त्यांच्या क्षेत्रातील समस्यांची माहिती लेखी स्वरूपात सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उल्हासनगर शहरात क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असून, क्रीडा शिक्षक व तज्ञांनी यामध्ये उपस्थित राहावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
उपस्थितीची विनंती:
क्रीडा शिक्षक
क्रीडा तज्ञ
संबंधित हितचिंतक
स्थळ:
उल्हासनगर महानगरपालिका, सर्वसाधारण सभागृह
वेळ:
२ डिसेंबर २०२४, सायंकाळी ४ वाजता
शहरातील क्रीडाविषयक सुविधा व त्यांच्या उभारणीसाठी आपल्या सूचना व माहिती लेखी स्वरूपात सोबत आणावी.