गुंजाई दशरथ गायकवाड यांची पुण्यतिथी निमित आदिवासी पाड्यात महिलांना साडी वाटप आणि लहान मुलांना खाऊ वाटप तसेच गरजू कुटुंबाना धान्यवाटप करण्यात आले. अपंग बांधवांना सायकल वाटप करण्यात आल्या.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
३ एप्रिल २००० साली महेश गायकवाड आणि भावंडाना एकटे सोडून आई वैकुंठवासी झाली. पण तिने तिच्या विचारांचा वारसा आम्हाला बहाल केला. तिचे संस्कार आज जगण्यास मार्गदर्शन करीत आहेत. तिची आठवण रोज आमच्यासोबत आहे. एक दिवस असा नाही की तिच्या आठवणीविना जात नाही. पण आजचा महेश गायकवाड आईचा पुण्यतिथीचा दिवस हा आम्ही भावंड आईच्या दातृत्वाची ईच्छा पूर्ण करण्यात घालवतो. माझ्या घरी आई असताना कोणी गरजू कधी रिकाम्या हाताने गेलेला आम्हाला आठवत नाही. म्हणून आज दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथी निमित्त मलंगगड परिसरातील खरड गावात आदिवासी पाड्यात महिलांना साडी वाटप आणि लहान मुलांना खाऊ वाटप केले. कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरात गरजू कुटुंबाना धान्यवाटप करण्यात आले. अपंग बांधवांना सायकल वाटप करण्यात आल्या.
या समयी माझ्या सोबत मलंगगड परिसरातील श्री. अशोक म्हात्रे(उपतालुक प्रमुख),सौ. रोशना पाटील(महिला अंबरनाथ ता. प्रमुख), श्री. वसंत म्हात्रे, श्री. शिवदास गायकवाड,श्री. सुभाष गायकर, श्री. पप्पू भोईर, श्री. रवी पाटील, शाखाप्रमुख-श्री. प्रशांत बोटे आणि गावकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शौर्य टाइम्स वतीने कै.सौ.गुंजाई दशरथ गायकवाड याना भावपुर्ण श्रद्धांजली.