विशेष पोलीस अधिकारी सन्मान सोहळा संपन्न.





कल्याण पूर्व: नीतू विश्वकर्मा
विधानसभा निवडणूक 2024 बंदोबस्ताच्या अनुषंगाने कोळशेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. दि. 09 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात विशेष पोलीस अधिकारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात बंदोबस्तासाठी महाविद्यालयांतील एनसीसी कॅडेट्स आणि इतर विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कमलादेवी कॉलेज, साकेत कॉलेज, मॉडेल कॉलेज, सनमयक कॉलेज, तसेच कल्याण पूर्व येथील 16 विशेष पोलीस अधिकारी व एनसीसी विद्यार्थ्यांनी या बंदोबस्तात मोलाचे योगदान दिले.
सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम होते. त्यांच्यासह पोलीस निरीक्षक (गुन्हे) आणि पोलीस निरीक्षक (प्रशासन) यांच्या हस्ते विशेष पोलीस अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अंमलदार, पोलीस मित्र तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यामुळे विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले असून, पोलीस आणि नागरिकांमधील सहकार्य अधिक बळकट झाले आहे.
– वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, कोळशेवाडी पोलीस स्टेशन, कल्याण पूर्व