राज्य उत्पादन शुल्क विभाग उल्हासनगर युनिट अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरवी कामात दिरंगाई म्हणुन ठिय्या आंदोलन ठिय्या.


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
राज्य उत्पादन शुल्क विभाग उल्हासनगर युनिट अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरवी कामात दिरंगाई आणि तक्रारी करून देखील अवैध पने चालणाऱ्या दारू वाहतूक / परवाने नसताना दारू विकणे / बसवून पाजने / दिलेल्या वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ चालणाऱ्या वाईन शॉप / FL 2 / F L 3 licence यांचे उशिरा पर्यंत चालणारे दुकाने / हॉटेल परवाने नसताना चालणारे आस्थापना विरोधात आज राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मा.श्री प्रवीण तांबे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले उल्हासनगर व कल्याण बदलापूर तालुका / शहरात ,परिसरात गुन्हेगारी मध्ये वाढ झाली असून त्याला जबाबदार राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर व कल्याण बदलापूर मधील अधिकारी वर्ग असून ते कोणत्या प्रकारची अनधिकृतपणे विना परवाना चालणारे धाबे हॉटेल चायनीज कॉर्नर वर सर्रास पने विकली जाणारी दारू पिणे पाजणे आहेत यावर कारवाई करण्यात कसूर करत असून संबंधित अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी शहरातील राष्ट्रीय छावा संघटना , राष्ट्र कल्याण पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( Sp ) व इतर संघटना आणि सहकारी यांच्या तर्फे आज ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यात अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सदर आंदोलनाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी वर्गावर योग्य ती कारवाई करण्यात येईल व शहरात चालणाऱ्या रात्री अपरात्री डान्स बार हॉटेल यावर विशेष धाडसी कारवाई करून सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल , यात जे कोणी कायदा नियम मोडून संबंधित हॉटेल चालवत असेल त्याला कायमस्वरूपी सील लावून बंद करण्यात येईल अशे आश्वासन ही अधीक्षक प्रवीण तांबे यांनी आंदोलन वेळी दिले त्यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निखिल गोळे , ऍड स्वप्नील पाटील ,शैलेश तिवारी, पियुष वाघेला ,राजू पाल, धनंजय मिश्रा , चेतन साळुंखे ,नितेश दातखिळे, ऋतिक दातखिळे, दिपक विश्वकर्मा, कृष्णा गोळे,दिलीप शाहू,राजदेव लालन , मुकेश वासवणी , अमर सुपे, नयनिश गोळे यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले येत्या सात दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जर सर्व बाबी व आश्वासन दिलेल्या वेळेत कारवाई नाही केल्यास सर्व संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सदर ठिय्या आंदोलन त्रिव करण्यात येईल अशे यावेळी इशारा वजा सूचना देण्यात आले.