अंबरनाथ विधानसभा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी.

अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव दीपक सोनोने, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष शैलेंद्र रुपेकर, परिवहन विभाग अध्यक्ष आबा साठे, यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले साहेब यांची भेट घेऊन अंबरनाथ विधानसभे बाबत चर्चा करून महाविकास आघाडी मधून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा असी आग्रही मागणी केली उल्हासनगर व अंबरनाथ मिळून एकत्रित अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आहे या संघात काँग्रेस पक्ष २०१४ मध्ये स्वातंत्र लढुन २०१९ आघाडी मधून लढुन दुसऱ्या नंबरला राहिलेला आहे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष सक्षम आहे तेथे काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येईल असी भुमिका दिपक सोनोने, यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले साहेब यांचेकडे मांडून दिनांक ११ जुन २०२४ जिल्हा काँग्रेस कमिटी व आघाडी संगठना विभाग सेल अध्यक्ष पदाधिकारी यांनी एक मताने पारित केलेला ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब व प्रदेश उपाध्यक्ष संगठन व प्रशासन नाना गावंडे यांना सुपुर्त केला.