उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात जनजागृती आंदोलन व तहसीलदारांना निवेदन.



उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
राष्ट्रीय निवडणूक आयोग दिवसाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने जनजागृती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनानंतर तहसीलदार कल्याणी कदम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबाबत चिंता व्यक्त केली. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने त्याला निष्पक्ष निवडणुका घेण्याचा अधिकार दिला आहे. तथापि, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर, काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती असल्याचे आरोप केले. काँग्रेसने २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यानंतर मतदारयादीत झालेल्या घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, परंतु आयोगाने त्यावर दुर्लक्ष केले.
निवडणुकीच्या निकालात ५० लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत का दिसली, आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था असताना मतदारयादीतील घोळ